Menu

परळचा राजा….    ||    माझा राजा….परळचा राजा….    ||    परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,नरेपार्क.

parelcha raja _logo_final trans new

 श्री गणेशाच्या कृपेने परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क,परळचा राजा‘ ही संस्था यावर्षी ७० वे वर्ष साजरे करीत आहे. गेली ६९ वर्ष ताठ मानेने संस्था चालविणे व तिचा दर्जा टिकवणे ही महत्त्वाची बाब आहे. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात आमचे गणेशोत्सव मंडळ सहकारी पध्दतीने चालविणे फार मोलाचे आहे. तर हे असेच कार्य ठेवून आमचे मंडळ शतकाकडे झेप घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबध्द आहोत. सन १९४७ साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ते एकत्र येवून या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला. या सर्व कार्यात आजी व माजी सर्व कार्यकत्यांनी मोलाची कामे केली. दुर्देवाने काही कार्यकर्ते आज हयात नाही, याची आम्हाला खंत आहे. मंडळ अनेक अडचणींना व आर्थिक संकटांना तोंड देत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना अनेक निष्ठावंत सभासद व कार्यकारी सभासदांचे बहुमोल सहकार्य लाभले. हे मोलाचे कार्य येणाऱ्या पुढील कार्यकत्यांना कधीही विसरून चालणार नाही.

फोटो गॅलरी


परळ चा राजा प्रत्यक्ष पाहणे साठी