॥ श्री गणेशाय नमः ॥
१९४७ पासून · गिरणगावचा मानाचा गणपतीपरळचा राजा
गिरणगावातील सामान्य गिरणी कामगारांनी उभारलेला, १९४७ पासून अखंड सुरू असलेला मानाचा गणेशोत्सव.
माझा राजा, परळचा राजा
श्री गणेशाच्या कृपेने परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क’ हा उत्सव सन १९४७ साली सुरू झाला. नरेपार्क मैदानात सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या मंडळाचा वटवृक्ष झाला.
आज मंडळ फक्त गणपती उत्सवापुरते मर्यादित नसून सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही कार्यरत आहे. शतकमहोत्सवी वर्षाकडे झेप घेताना सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.
घरबसल्या बाप्पाचं दर्शन
मंडपात येणं शक्य नसेल तरी दर्शन चुकू देऊ नका — परळच्या राजाचा थेट प्रक्षेपण इथेच पाहा.
कार्यक्रम
दहा दिवस मंडपात चालणारे धार्मिक, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम.
श्रीं गणेश पूजा
उत्सवाची सुरुवात — विधिवत प्राणप्रतिष्ठा व पूजन.
पाहा
महाआरती
हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारी सामूहिक महाआरती.
पाहा
सत्यनारायण पूजा
दरवर्षी मंडपात होणारी पारंपरिक सत्यनारायण महापूजा.
पाहा
मंगळागौर
महिलांचे पारंपरिक खेळ, गाणी आणि रात्रभर रंगणारा जागर.
पाहा
हळदी कुंकू
विभागातील भगिनींसाठी दरवर्षी आयोजित हळदी-कुंकू समारंभ.
पाहा
पथनाट्य
समाजप्रबोधन करणारी, कार्यकर्त्यांनी सादर केलेली पथनाट्ये.
पाहासामाजिक बांधिलकी
उत्सव दहा दिवसांचा, पण मंडळाचं समाजकार्य वर्षभर सुरू असतं.
रक्तदान शिबीर
दरवर्षी उत्सवकाळात आयोजित होणारे रक्तदान शिबीर.
पाहा
नेत्र चिकित्सा शिबीर
विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी.
पाहा
वृक्षारोपण (अलिबाग)
पर्यावरण रक्षणासाठी अलिबाग परिसरात वृक्षारोपण मोहीम.
पाहा
विद्यार्थी गुणगौरव
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
पाहा
पूरग्रस्तांना मदत
कोल्हापूर, इचलकरंजी व चिपळूण येथील पूरग्रस्तांना थेट मदत.
पाहा
आदिवासी गाव भेट
गारगांव, मांगरोळगांव-वाडा येथे दिवाळी भेट व मदत.
पाहादर्शनाला नक्की या
अभय शिखा, भिवाजीराव नारे उद्यान,
नरेपार्क, परळ (पूर्व), मुंबई – ४०००१२.